सोमवार, २५ जानेवारी, २०२१

कोरोना योध्दा

जय हिंद
आज प्रजासत्ताक दिन व कोरोना काळानंतर
 चा पहिला प्रजे चा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन 

खरंतर आपल्या सर्वांचे भाग्य आहे कोरोना नंतर महामारी नंतर आपण जगलो आपल्याला जगवणारे केंद्र सरकार, राज्य सरकार व महानगरपालिका, ग्रामपंचायत , प्रशासकीय अधिकारी व नव्याने जन्माला आलेले कोरोना योद्धे या सर्वाचा सिहाचा वाटा आहे .आपण जगलो या मागे नक्कीच देवाला आपल्या कडून काही कामे करून घ्यायची आहेत म्हणूनच आपण जगलो खरतर आम्ही कोविड योद्धे आम्हाला न्याय मिळेल की ,नाही मला माहित नाही  मला विश्वास आहे सरकार व प्रशासन आम्हाला न्याय देहील ही पण आज आमचा परिवार सोडून आम्ही त्यागाने पुढे आलो सर्व जण आपला परिवार वाचवा या साठी झटत होता त्यावेळी आम्ही योद्धे आपल्या साठी दिवस रात्र एक करत होतो आज आम्हाला आपल्या कडून एक आश्वासन हवे आहे 

कोरोना योध्दा आपल्या कडे मागत आहे

आज प्रजेच्या दिवशी आपण व्रत घ्या

◆  नोकरीत कोठेही असेन पण काम मात्र मी देश हितासाठी काम करेन ते काम एक जबाबदारी म्हणून व देश प्रगतीवर नेण्यासाठी करेन 

◆ संविधान चा आदर करेन माझी गीता,बायबल, कुराण संविधान असेन

◆ आपली मातृभाषा मी रोज आपल्या घरात व परिसरात वापर करेन भारतीय भाषा व मातृभाषा याचा जास्तीतजास्त वापर करेन

◆ मी स्वतः एक व्यक्ती किंवा परिवाराची जबाबदारी घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करेन व त्याना प्रतिष्ठित व आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करेन

या चार नक्की करा 
आम्हा कोरोना योध्दासाठी ज्यांनी 15 - 15 तास जीव धोक्यात टाकून काम केले त्याच्यासाठी  ,आम्हाला माहिती आहे आज आम्हाला सर्व महानगरपालिका काढून टाकत आहे आमच्या वर अन्याय होत आहे एखाद्या वेळेस सरकार आमचा विचार करेलही  पण तुम्ही आमच्या साठी काय करणार आम्ही तुमच्या कडे आज मागत आहोत

देशभरातील कोरोना योद्धा आपल्याकडे मागत आहे

कोरोना योध्दा कर्मचारी परिषद
7977389380